श्रीरामपूर दिपक कदम येथील आगाशेनगरच्या डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूल,केजी विभाग "क्रीडा सप्ताह उद्घाटन कार्यक्रम नुकताच अतिशय उत्साहात पार पडला,या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ब्लेसा, व्यवस्थापक फादर फ्रँको तसेच केजी विभाग सहाय्यक सल्लागार सिस्टर रिनी,यांच्या हस्ते करण्यात आले.
केजी विभाग प्रमुख आयेशा शेख ,वर्षा कांबळे,अर्चना झरेकर,निकिता मार्शिया शिक्षकवृंद सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
उद्घाटन कार्यक्रम पार पडल्यानंतर केजी विभागातील मुलांची संचलन ,नृत्य पालक व विद्यार्थी यांचे वेगवेगळे मनोरंजक खेळ,माता पालकांसाठी जाळ विरहित स्वयंपाक स्पर्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
