संगमनेर मच्छिंद्र पवार तालुक्यातील कोकणगांव शिवापुर येथे ब्ल्यू टायगर युवा फोर्स च्या वतीने बुद्धभुमीच्या भारत वर्षातील लोकनायक संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक अनोखी श्रध्दांजली वाहण्यात आली.
काल सायंकाळी महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला औचित्य साधून कोकणगांव शिवापुर येथील युवकांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची आय लव आंबेडकर नावाचा विद्युत फलक कोकणगांव येथील संविधान चौकात उभारला.
विद्युत रोषणाई केलेला बॅनर लावण्यात आल्याने अनेकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.त्यासाठी बाळासाहेब पवार रामनाथ गायकवाड नाना पवार चेतन पवार तेजस गायकवाड मच्छिंद्र पवार सोमनाथ पवार संदीप पवार योगेश पवार चंद्रकात पवार संजय पवार तेजस पवार वैभव पवार सम्यक पवार हर्ष पवार राहुल पवार संजय भालेराव रवि पवार डॉ मंगेश पवार दत्तु पवार विकास गवळी घनशाम भोसले पत्रकार भाऊसाहेब पवार तसेच कोकणगांव शिवापुर ग्रामपंचायत संरपच उपसरपंच सदस्य याचे विशेष सहकार्य लाभले.
या बॅनरचे अनावरण उपसरपंच सौ.राधिका बाळासाहेब पवार व ग्रामपंचायत सदस्य सौ.संजना मच्छिंद्र पवार याच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले यासाठी शेकडो भिम अनुयायी उपस्थित होते.
