सामाजिक क्षेत्रात विविध कौशल्याने अनेक पद्धतीची कामे केली जातात ज्याचे त्याचे काम करण्याची पद्धत ही आगळीवेगळी असू शकते मात्र क्षेत्र कुठलेही असो राजकीय सामाजिक व कला रंजन आपापल्या क्षेत्रात आपण किती उल्लेखनीय काम केलं याची दखल समाज नेहमी आपली घेत असतो त्याच्या कामाची दखल समाजात अनेक ठिकाणी घेतली जाते आणि त्यास पुरस्कार स्वरूपाने गौरवकित केले जाते ही वाखाणण्याजोगी गोष्ट असते मात्र आज काही उपटसुंभ लोकांकडून पुरस्काराला बाजारु आणि धंदेवाईक आले आहे हे दुर्दैवी आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या दगडाची मूर्ती घडवीत असताना त्या दगडावरती झालेला आघात हा शेवटी मूर्तीच्या रूपात येतो त्याची किंमत मंदिरात दैव्य शक्तीच्या रूपाने भावनिक होऊन आपण पुजतो पण यामागे त्या दगडाची सोसलेला घाव त्यालाच माहीत असतो तो जे पर्यंत दगड म्हणून पडलेला असतो तोपर्यंत त्याच्याकडे कोणीही पाहत नसते.
तात्पर्य एवढेच सांगायचे की आज समाजात पुरस्काराच्या बाबतीत हेच दिसत आहे पुरस्काराचे पेव्हं फुटले आहे.समाजात पुरस्काराच्या नावाखाली स्टंटबाजी करत कुठलेही काम व कार्य नसणाऱ्या व्यक्तींना हा बाजारू पुरस्कार देऊन समाजात कुठेतरी केविलवाणी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न काही महाठक करत आहे.
कुठले काहीतरी नाव देऊन खूप मोठा पुरस्कार असल्याचा देखावा समाजात चालला आहे त्याला कुठलेही रजिस्ट्रेशन नसताना व चित्रपट महामंडळाची परवानगी हवी असते हे देखील काही मंडळींना माहीत नसते आपण ज्या व्यक्तीला पुरस्कार देतो त्या व्यक्तीचे कार्य त्याची केलेल्या कामाची गुणवत्ता आणि पावती तपासली जाते.
त्या आधारावर त्याला तो पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार कुठल्या पैशाने देता येत नाही आता फक्त एकच चालू आहे लोकांना भावनिक करून पुरस्काराच्या नावाखाली आपला स्वार्थ साधूपणा कसा साधता येईल हा प्रयत्न करत आहे त्यास धंद्याचे स्वरूप येऊ लागले आहे.
यास कुठेतरी आळा बसायला हवा जेणेकरून ज्यांची मेहनतीने खरोखर प्रामाणिकपणे केलेले यश हे पुरस्काराच्या रूपाने अभिमानास्पद सन्मानावर गदा येऊ नये चित्रपट महामंडळाने त्वरित अशा फसव्या पुरस्कारांवर त्वरित बंदी घालावी व त्यांच्या मान्यतेची चौकशी करावी असे मत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी व्यक्त केले आहे.
प्रमोद पंडित
सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक
