ह.भ.प. डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांचे प्रतिपादन
दाढ खुर्द सप्ताहात भक्तांचा महासागर
झरेकाठी सोमनाथ डोळे अमृतवाहिनी प्रवरेच्या कुशीत वसलेल्या,संत महिपती महाराज व संत मुकुंददास महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र दाढ खुर्द येथे सुरू असलेल्या ब्रम्हलीन सद्गुरू माणिकगिरी महाराज, बिरोबा महाराज अखंड हरीनाम सप्ताहामध्ये रविवारी भक्तीचा उत्कर्ष अनुभवायला मिळाला.
डॉ. ह.भ.प. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांची किर्तन सेवा भव्य भक्तीरसात रंगली.‘हरिपाठ किर्ती मुखे जरी गाय’ या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचे चिंतन मांडत त्यांनी सांगितले की नामस्मरण हेच श्रेष्ठ साधन
हरीनाम सतत जपणाऱ्या भक्तांचे मन, वाणी आणि कर्म पवित्र होते. बाह्य पूजा नसेल तरी चालेल नाम हेच खरे मंदिर घडवते.हरीचे नाव जपणारा भक्त सात्त्विक,निर्लेप आणि पुण्यवान बनतो.त्यांच्या रसाळ आणि प्रभावी वाणीतून संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघाला. सप्ताहाच्या सहाव्या दिवशी हजारो भाविकांनी दाढ खुर्द येथे मोठी गर्दी केली.
किर्तनानंतर पंचक्रोशीतील गावांच्या सहकार्याने दाढ खुर्द मधील नागरिकांना आमटी–भाकरीचा भव्य महाप्रसाद आयोजित केला होता.संपूर्ण सप्ताह महंत दत्तगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध व दिव्य पद्धतीने पार पडत आहे.
मुख्य आकर्षण – भव्य महाप्रसाद, दि. २ डिसेंबर रोजी
सकाळी रामेश्वर उंबरेश्वर देवस्थानचे महंत दत्तगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन त्यानंतर ५ क्विंटल हरबरा १२ क्विंटल साखर हरबरा डाळ ६ क्विंटल यात बुंदी व मिसळ यांचा अत्यंत मोठा महाप्रसाद होता सप्ताहाला वाढती गर्दी पाहता १५–२० हजार भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.दाढ खुर्द सप्ताह – भक्तीचा महोत्सव, प्रामाणिकपणाचा आदर्श व समाजसंस्कारांची अखंड परंपरा दिसून आली.
हरविलेले डोरले प्रामाणिकपणे महिलेस सुपूर्त
रात्री प्रसाद घेताना पिंप्री लौकी–अजमपूर येथील कलाबाई ज्ञानदेव भागवत यांना दिड तोळे सोन्याचे डोरलं व मणी सापडले.प्रामाणिकपणे त्यांनी तत्काळ ते दाढ खुर्द सप्ताह समितीकडे जमा केले.हरविलेले सोनं खळीच्या कांगणवाडी येथील ताराबाई सखाराम घुगे यांचे असल्याचे स्पष्ट होताच,सप्ताह समितीने ते महंत दत्तगिरी महाराजांच्या हस्ते परत सुपूर्द केले.
