वरवंडीची स्थापलिंग खंडोबा यात्रा उत्साहात

Cityline Media
0



स्थापलिंग गडावर आजतागायत ऐतिहासिक गर्दीचा गर्दीचा उच्चांक

वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील वरवंडी स्थित असलेल्या स्थापलिंग खंडोबा देवस्थान यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली यावेळी नाशिक ,पुणे,अहिल्यानगर संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यांमधून लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवली.
आदर्श दरवर्षीप्रमाणे आपली देवस्थान वरवंडी यात्रा २६ व २७ डिसेंबर रोजी पार पडली यावेळी लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.या यात्रेला ऐतिहासिक वारसा वारसा असून चाळीसक्रोशीत प्रसिद्ध आहे स्थापलिंग खंडोबा अनेक गावांचे कुलदैवत देखील आहे.
नवसाला पावणारा खंडोबा म्हणून या देवस्थानची मोठी ख्याती आहे यात्रेची सुरुवात स्थापलिंग तरुण मित्र मंडळ वरवंडी यांनी आणलेल्या जेजुरी ते वरवंडी या पायी ज्योत यात्रेने सुरुवात होते सकाळी अकरा वाजता गडावरील ज्योत पेटवून यात्रेला प्रारंभ होतो.संध्याकाळी पारंपरिक लोकनाट्य सादरीकरण झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मानाच्या काठ्यांच्या मिरवणूक पार पाडून दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते संध्याकाळी तीन वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा देखील भरला होता.

यात्रेनिमित्त पहिल्या दिवशी येथील शिवाजी दातीर यांची महाप्रसादाची भोजन पंगत असते यावेळी पहिल्या दिवसापासून आधार रक्त पिढी संगमनेर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात येत.यात्रेनिमित्त कवठे मलकापूरचे आकर्षण समजले जाणारे बैल जोड्या या ठिकाणी यात्रेसाठी भेट देतात.त्यामध्ये संगमनेर तालुक्याचे नाव महाराष्ट्रात गाजवणारा पुसेगाव मैदानाचा यावर्षीचा चार नंबरचा मानकरी सुलतान याला गाडामालक रहमान शेख हे दर्शनासाठी गडावर आणतात. त्याला पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!