मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुंबई आणि दिल्लीतील हवा आरोग्यासाठी घातक बनली आहे. ब्रिटनमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या फुफ्फुस आणि हृदयविकार तज्ज्ञांनी हा अत्यंत धक्कादायक इशारा दिला आहे.
प्रदूषण हा भारताची सर्वात मोठी आरोग्य समस्या बनत चालली आहे. आताच जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती अधिक बिकट बनू शकते. डॉक्टरांच्या मते,उत्तर भारतातील लाखो लोकांच्या फुफ्फुसांना अधीक गंभीर इजा झाली असल्याचे समजते.
