डॉ.सुजय विखेंनी पत्नी समवेत केली सावळी विहीर येथील बांधकामाची पाहणी

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राहाता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदार संघातील सावळी विहीर  येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी डॉ.सुजय विखे व सौ.धनश्री विखे यांनी
स्थळी भेट देत सखोल पाहणी केली.
यावेळी सुरू असलेल्या कामाचा दर्जा,प्रगती आणि नियोजन यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पाहणी दरम्यान संबंधित ठेकेदारांकडून संपूर्ण प्रकल्पाच्या आराखड्याची माहिती जाणून घेतली असता काही तांत्रिक व अंमलबजावणीतील त्रुटी निदर्शनास आल्या.त्या त्रुटींवर सविस्तर चर्चा करून काम दर्जेदार व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

या पाहणीवेळी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्री विखे यांच्यासह इतर जनता उपस्थित होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!