आश्वी खुर्दच्या ऐतिहासिक अश्व स्मारकाचा गुदमरलेला श्वास अखेर मोकळा

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेल्या अश्व स्मारकाच्या जिर्णोद्धाराला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे कौलाघात दुर्लक्षित झालेल्या या स्मारकाला नवसंजीवनी मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान आणि चेतन्य निर्माण झाले आहे.
 नियोजित स्मारकासाठी येथील श्रीमती लिलाबाई राजेंद्र जगताप व त्यांच्या परिवारांने स्वतःची जागा उपलब्ध करून दिली. तसेच अनेक दानशूर नागरिकांनी आर्थिक सहकार्य केल्याने व ग्रामस्थांच्या भावनिक पाठबळातून हा उपक्रम साकार झाला.

जिर्णोद्धाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात कॉलम स्लॅपचे  काम पूर्ण झाले होते अखेर इच्छाशक्ती,देवकृपा आणि जेष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा कामाला गती देण्यात आली. यावेळी ह.भ.प. दत्तगिरी महाराजांच्या प्रेरणेने व साईनाथ गाडेकर सोमनाथ गाडेकर रमेश गाडेकर बंधूंच्या अथक परिश्रमातून अत्यंत देखणे असे कोरीव लाकडी अश्व शिल्प साकार करण्यात आले.

हे शिल्प निर्माण केल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी कैलास गायकवाड संतोष भडकवाड संजय गायकवाड आदि उपस्थित होते.महिनाभर चाललेल्या कोरीव कामामुळे अश्व स्मारकाला नव्या रूपात प्रतिष्ठा प्राप्त झाली असून,गावाच्या ऐतिहासिक अस्मितेला देखील नवे बळ मिळाले आहे.

या अश्व स्मारकाचे लोकार्पण येत्या जानेवारी महीन्यात होणार असून,जगताप परिवाराच्या वतीने विधीवत पूजा होणार आहे.पेशवेकालीन गणेश मंदिराप्रमाणेच अश्व स्मारक हे आश्वी खुर्दच्या अस्मितेचे अविभाज्य प्रतीक मानले जाते.

आजही गावातील कोणताही धार्मिक,सामाजिक किंवा मंगलकार्य अश्व स्मारक दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही, अशी गावाची परंपरा आहे.ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या या प्रयत्नाला यश आल्याने ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!