नाशिक दिनकर गायकवाड गाडीचा व्यवहार करण्याच्या बहाण्याने चावी मागितली असता ती न दिल्याने एका इसमाने गाडी मालकाच्या हातातील चावी बळजबरीने हिसकावून गाडीसह पळून गेल्याची घटना जय भवानी रोड येथे घडली.
याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी राकेश विजय चांडक (रा. स्वामी विवेकानंदनगर,जय भवानी रोड, नाशिकरोड) हे रिक्षाचालक असून, त्यांच्या नावावर एमएच १५ जेडी १६२१ या क्रमांकाची गुंडाई कंपनीची सात लाख रुपये किमतीची ओरा गाडी आहे.
या गाडीचा व्यवहार करण्याच्या बहाण्याने आरोपी हेमंत पुरुषोत्तम गोसावी (रा. सहजीवननगर, गणेशवाडी) हा इसम चांडक यांच्या घरी आला. गाडीचा व्यवहार करण्याच्या बहाण्याने त्याने चांडक यांच्याकडे गाडीची पडताळणी करण्यासाठी चांडक यांच्याकडे गाडीची चावी मागितली; मात्र चावी देण्यास नकार दिला असता आरोपीने चांडक यांना जोराचा धक्का देऊन त्यांच्या हातातून गाडीची चावी हिसकावली व गाडी घेऊन पसार झाला.या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
