रीलस्टार कोमल काळे वास्तवात बस मधील महिलांचे पर्स चोरी करणारी सराईत गुन्हेगार

Cityline Media
0
 गुन्हेगार,स्थानिक गुन्हे शाखेकडुन बंटी- बबलीची जोडी जेरबंद. 
अहिल्यानगर प्नतिनिधी सोशल मीडियावर अंतरंगी हालचाली करत प्रकाश झोतात आलेली रिलस्टार कोमल काळे वास्तवात चोर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की ,नुकतेच  दुपारच्या सुमारास फिर्यादी सौ. अलका मुकुंद पालवे, (वय - ३९) वर्षे, रा. देवराई, ता. पाथर्डी, हे त्यांचे कामनिमित्त पाथर्डी ते कल्याण एस.टी. ने पाथर्डी येथुन प्रवास करीत असतांना,कोणीतरी अनोळखी महिलेने फिर्यादीचे समंतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःचे फायद्याकरीता सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली होती. या चोरीच्या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. १२७५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या बसमधील चोरी व बस स्थानक परिसरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिले होते.

या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक  किरण कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये पोलीस अंमलदार सुरेश माळी, विष्णु भागवत, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रकाश मांडगे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, भगवान थोरात, जालींदर माने, महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, ज्योती शिंदे, सोनाली भागवत, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.

पथकाने गुन्ह्यातील आरोपीचे व्यवसायिक कौशल्याचा वापर करुन नमुद गुन्ह्यातील महिला आरोपी हि पाथर्डी शहरातील नवीन बस स्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले. पथकाने तिला शिताफीने ताब्यात घेवुन तिचे नांव गाव विचारले असता तिने तिचे नांव १) कोमल नागनाथ काळे (वय - १९) वर्षे रा.पाथर्डी रोड, भिमसेननगर शेवगांव ता. शेवगांव असे असल्याचे सांगितले. तिला विश्वासात घेवुन गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता. तिने सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर रा. निपाणी जळगांव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर याचेकडे दिला असल्याचे सांगितले  आहे.

त्यानंतर  पथकाने आरोपी नामे सुजित राजेंद्र चौधर याचा  शोध घेत असता, तो शेवगाव, शंकरनगर येथील त्याचे घरी आल्याची महिती मिळाल्याने,पथकाने तात्काळ त्याचे घरी जावुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव १) सुजित राजेंद्र चौधर  (वय - २५ वर्षे)  मुळ रा. निपाणी जळगांव ता. पाथर्डी जि. , हल्ली रा.शंकरनगर शेवगांव ता. शेवगाव असे असल्याचे सांगितले.

त्यास त्याची प्रियसी कोमल काळे हिने बस मधील महिलांचे पर्स मधील चोरी केलेल्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम बाबत विचारपुस केली असता त्याने कळविले की, कोमल हिने चोरी केलेल्या रोख रक्कमेतुन आम्ही १) १,७००००रुपये किमंतीचा आय फोन १७ प्रो मॅक्स मोबाईल २) १५,००रु कि.चा ओप्पो कंपनीचा मोबाईल विकत घेतले होते. तसेच ७,४८०००,-रुपये किंयतीचे ६.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने माझ्याकडे दिले होते. त्याप्रमाणे आरोपीकडुन वर नमुद मोबाईल, सोन्याचे दागिने व  २२३०रुपये रोख रक्कम असा एकुण ९,३५,२३०;रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच महिला आरोपी कोमल नागनाथ काळे  व आरोपी नामे सुजित राजेंद्र चौधर  यांना विश्वासात घेवुन आणखी गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी १) अमरापुर ते शेवगाव जाणारे बसमध्ये दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्स मधुन सोन्याचे दागिने चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच २) दिनांक 20/11/2025 रोजी पाथर्डी ते भगुर जाणारे बसमधुन एक महिलेचे पर्समधुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली असल्याचे सांगितल्याने सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस स्टेशनचे अभिलेखाची खात्री केली असता खालील प्रमाणे गुन्ह्याची नोंद आहे

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
१ )शेवगाव  जि. अहिल्यानगर गु.र.नं. ९०८/२०२५ बी.एन.एस. क. ३०३(२)
२) शेवगाव  जि. अहिल्यानगर गु.र.नं.९५९ /२०२५ बी.एन.एस.क.३०३ (२)
 
महिला आरोपी नामे कोमल नागनाथ काळे हिचेविरुध्द यापुर्वी बीड व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
१)शिरुर कासार जि.बीड १७८२०२२/ भा.द.वि. क. ३६३३२४,३२३,,५०४,५०६, ३४
२)गेवराई जि. बीड ५२९/२०२२ महाराष्ट्र पोलीस अधि.क.१२४
३) सुपा जि.अहिल्यानगर६७ /२०२४भा.द.वि. क. ३७९
आरोपी नामे सुजित राजेंद्र चौधर याचेविरुध्द यापुर्वी बीड व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दरोडा,जबरीचोरी,  घरफोडी व इतर आठ गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
१ सोनई जि. अहिल्यानगर १९१/२०२२ भा.द.वि. क. ३०५,३९२,३६३,३४१,४१२
२२सोनई जि. अहिल्यानगर १६३/३०२२ भा.द.वि. क.३०५,३४१
३ सोनई जि. अहिल्यानगर १८४/२०२२ भा.द.वि. क. ३९२,२०१, ३४
४ पाथर्डी जि. अहिल्यानगर ९०/२०२२ भा.द.वि. क. ३९२,२०१,३४
५ पाथर्डी जि. अहिल्यानगर ८८/२०२३ भा.द.वि. क. ४५४५७,,३८०
६ तोफखाना जि. अहिल्यानगर ३९३/२०२४ म.पो.का.क.१२९,१३१(क)
७ एम.आय.डी.सी. जि. अहिल्यानगर ३२१/ २०२५ बी.एन.एस.क.३१६(२),३१७(२)
८चकलंबा जि.बीड ८४/२०२२ भा.द.वि.क.३९२,४३
ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. १३७५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन, पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. 
या गुन्ह्यातील महिला आरोपी कोमल नागनाथ काळे हि रिलस्टार असुन तिचा इंस्टा आय. डी.  komal¬_ kale_1__ असा असुन तिचे 50 हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तसेच बसमध्ये प्रवास करत असतांना कोणत्याही अनोळखी भोळ्या भाबड्या चेह-याच्या महिला व इसमावर विश्वास ठेवु नका व आपले मौल्यवान सामानाची काळजी घ्यावी, असे नागरिकांना अव्हान करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!