दत्त जयंतीला भव्य यात्रेचे स्वरूप;जयंती उत्साहात
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी या ठिकाणी दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी वरवंडी व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून एक आगळावेगळा सोहळा निर्माण केला वरवंडी दत्तगड हे एक जागृत देवस्थान असून या देवस्थानची मोठी महिमा आहे हे देवस्थान या ठिकाणी स्थित करण्यावेळी या ठिकाणी माहूर येथील महंत
नंदलाल महाराज यांनी व गावातील उपदेशी मंडळी अकरा दिवस तपश्चर्या करून या ठिकाणा वरील विशेष वरवंडी दत्तकडे या ठिकाणी अनुसूचित केला तेव्हापासून या देवस्थानचे महत्व अधिकाधिक वाढले या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी गावातील भोसले परिवाराने ११ गुंठे जागा मंदिरासाठी दान दिली आज सोहळा मोठा झाला असून हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात.दत्त जयंतीच्या निमित्ताने समस्त उद्देशी मंडळाने सात दिवसांचा अखंड नामस्मरण सप्ताह या निमित्ताने सालाबाद प्रमाणे करण्यात आला.
सकाळी सोहळ्याला परमपूज्य प्रवीण राज शिवनेकर बाबा यांच्या प्रवचन रुपी सेवेने प्रारंभ झाला यावेळी सध्या गादीवर असलेल्या महंत विद्या लाड या देखील उपस्थित होत्या यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
आलेल्या भाविकांना महाप्रसादाची देखील व्यवस्था यावेळी करण्यात आली.प्रसंगी नितीन बाळासाहेब गागरे,दिगंबर रभाजी ढमाले,रोहिदास साहेबराव पाटोळे यांनी स्वखर्चाने पंच पक्कवांनांचे जेवण दिले.स्वतःच्या शेवटी येथील सेवेकरी संतोष लाड यांचा तुळशीराम लक्ष्मण पाटोळे व गोरक्षनाथ काळे व समस्त उपदेशी मंडळ दत्तगड वरवंडी यांच्यावतीने सन्मान करण्यात आला आणि आलेल्या सर्व भाविकांचे आभार मानले.
