नाशिक दिनकर गायकवाड आगरटाकळी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक राहुल दिवे व ज्येष्ठ नागरिक अरुण शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एक लेखक, विचारवंत, समाजसुधारक होते.महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य सामाजिक समानतेसाठी व शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण होते,असे मनोगत माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक एज्युकेशन क्रेडीट सोसायटीचे सचिव साहेबराव सवारी पवार यांनी केले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक विजय ओहोळ, माजी नगरसेविका आशा तडवी, नाशिक शहर राष्ट्रवादी
युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल जोंधळे, प्रवीण नवले, बाबा पवार, मनीष डांगे, प्रवीण पाटील, तुषार सोनकांबळे, रफिक तडवी,अभिजित कोल्हे, संजय लोखंडे,रवींद्र पाटील, गणेश शिंदे, बाळासाहेब झिप्रे, अमोल फुलसुंदर, हर्षल शिंदे, दत्ता झिप्रे, अंबादास लोखंडे, पंकज पाटील, मुन्ना तडवी, कांतीलाल केदारे, अशोक परदेशी,सनी साळवे, जयंत म्हैसधुणे, साकिब सय्यद, जयेश पवार आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
