महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानकावर भीमसैनिकांना अन्नदान
नाशिक दिनकर गायकवाड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव नाशिकरोड समिती व संयोजक समितीचे प्रमुख सुनील कांबळे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भीमसैनिकांसाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला.
गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेली अन्नदानाची परंपरा यावर्षीही कायम ठेवत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला स्टेशनवरून मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या भीमसैनिकांसाठी खाद्य पदार्थ वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. या अन्नदान उपक्रमात समितीचे प्रमुख सुनील कांबळे, कार्यक्रमाचे आयोजक मा. न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे,अशोक आव्हाड, मुकेश वीर,अतुल भावसार, अक्षय बर्वे, अजित दिवेकर, सखाराम वीर, हर्षवर्धन दिवेकर,बलभीम वीर, दिलीप अहिरे, राजाभाऊ जाधव,अक्षय शेलार, आशिष इंगोले,अनिकेत नेतारे, सुरज केसर,अरबाज शेख,तेजस शेलार,किशोर भंडारे आदी उपस्थित होते.
