लोहगाव कोंडीराम नेहे दिल्ली येथे आय सी ए आर, आय ए ए आर तसेच कृषी जागरण पुसा ॲग्रिकल्चर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा फार्मर ऑफ द इयर अवॉर्ड या पुरस्काराने राहता तालुक्यातील लोहगाव येथील गुरुकृपा ॲग्रो ट्रेडर्सचे संचालक अक्षय बाबासाहेब चेचरे यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे युवानेते डॉ.सुजय विखे मा.जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शालिनी विखे.लोहगाव सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे उपाध्यक्ष राजेंद्र चंद्रभान चेचरे.कृष्णा चेचरे लक्ष्मण चेचरे, प्रविण चेचरे,अनिल चेचरे,कुमार चेचरे,गणपत शिंदे, डॉ.प्रशांत नाईकवाडे अध्यक्ष रोमिप इंडिया,बाबासाहेब भा.चेचरे ,सचिन चेचरे पत्रकार कोडीराम नेहे.विजय चेचरे आदींनी अभिनंदन केले.
