लोहगाव कोंडीराम नेहे मराठा राजपुत क्षत्रिय महामेळावा १६ डिसेंबर २०२५ रोजी श्रीरामपूर साई सुधा लॉन्स,बेलापूर रोड येथे दुपारी १२ वाजता पार पडणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक डॉ.कृषीराज टकले व क्षत्रिय करणी सेना संस्थापक डॉ.राज शेखावत यांनी दिली आहे.
मराठा राजपुत क्षत्रियांनी देशभर एकत्र यावे यासाठी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक डॉ कृषीराज टकले पाटील व क्षत्रीय करणी सेना संस्थापक डॉ राज शेखावत हे सातत्याने प्रयत्न करत आहे या मेळाव्यासाठी देशातील राजपुत मराठा क्षत्रिय समाज वेगवेगळ्या राज्यातून समाज बांधव उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मराठा राजपुत समाजासाठी हा मेळावा महत्वपूर्ण आहे.
मराठा राजपुत मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दिपक पवार,प्रदेश कार्याध्यक्ष शशिकांत पाटील,राज्य निरिक्षक भानुदास वाबळे पाटील, इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र निंबाळकर यांनी केले आहे
