तू माझ्याशी लग्न कर, तुझं लग्न दुसरीकडे होऊ देणार नाही असे म्हणत केला तरुणीचा विनयभंग

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड एकतर्फी असलेल्या प्रेमातून २५ वर्षीय युवकाने एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उंटवाडी रोडवर घडली.                छाया रेखांकन-प्रकाश कदम 
याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. ८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ती उंटवाडी रोडवरील दुकानात काम करीत होती. त्यावेळी तिच्या ओळखीचा असलेला आरोपी यश राजेंद्र पवार (वय २५, रा. समतानगर, टाकळी रोड) हा तेथे दुचाकीवरून आला. "तू माझ्यासोबत लग्न कर, माझ्यासोबत मैत्री ठेव. तुझे लग्न दुसरीकडे होऊ

देणार नाही, तुला बरबाद करून टाकीन," असे म्हणत त्याने तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली. नंतर त्याने तिला पकडून दुकानातून बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आपल्या पालकांना कळविण्यासाठी तिने आईवडिलांना फोन लावला. त्यावेळी यशने तिचा मोबाईल हिसकावून दुकानाच्या बाहेर आपटून फोडून टाकला.

या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!