लोकप्रतिनिधींचे प्रयत्न फलद्रूप; नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या पुढाकाराचे कौतुक
झरेकाठी सोमनाथ डोळे शिबलापुर ते गुहा फाटा हा महत्त्वपूर्ण रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून जिर्णावस्थेत होता. स्थानिक नागरिक,शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना या रस्त्यामुळे होत असलेली दैनंदिन गैरसोय अखेर संपुष्टात येणार आहे. अनेक वर्षांची मागणी, निवेदने आणि पाठपुरावा याला यश येत, या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला आहे.मंत्री विखे पा. यांच्या पुढाकाराने रस्ता दुरुस्ती जलद मार्गी लागल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
शिबलापुर–गुहा फाटा रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन हा मुद्दा माध्यमांत,निवेदनांद्वारे तसेच विविध मार्गांनी वेळोवेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. युवानेते डॉ.सुजय विखे व जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता.
स्थानिक शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिल्यानंतर, ना. विखे पाटील यांनी स्वतः स्थळ पाहणी करून तातडीने कामाला प्रारंभ करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या पुढाकारामुळे काही दिवसांपूर्वीच या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर परिसरातील विद्यार्थी,शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंद व दिलासा पसरला आहे.
खड्डेमुक्त,सुरक्षित व सुलभ प्रवासाचा मार्ग अखेर खुला होणार असल्याने सामान्य जनतेचा जीव कीव लागलेला त्रास आता कमी होणार आहे.प्रसंगी स्थानिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याया की “ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तत्परतेमुळेच हे काम वेगाने मार्गी लागले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाला त्यांनी दिलेली दखल अभिनंदनीय आहे.”
स्थानिक नेतृत्व आणि नागरिकांकडून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाल्याबद्दल
ना. राधाकृष्ण विखे पा.डॉ. सुजय विखे पा.
अक्षय कर्डिले यांचे.रमेश पन्हाळे, प्रमोद नालकर, वसंतराव पाटील डुकरे, प्रकाश ताटे,बलराज वसंत डुकरे,
भारत गिते, सरपंच अलका शिंदे, विलास मुसमाडे, व्ही. आर.अनाप, नामदेवराव डुकरे, कारभारी ताठे, मा. सभापती राहुरी पंचायत समिती भिमराज हारदे,डॉ. सुभाष शिंदे,माधव हारदे,बाळकृष्ण हारदे,विष्णू सिनारे, विलास गागरे, योगेश चोरमुंगे, राजेंद्र चोरमुंगे, संजय चोरमुंगे,
प्रकाश डुकरे,भाऊसाहेब पलघडमळ, मनोज हारदे, शिवा हारदे, अमोल हारदे, सरपंच सतीश जोशी, सोपान गागरे, प्रा. कान्हु गिते, सुरेश नागरे, माजी सरपंच अशोक जोशी, नारायण कहार, सरपंच संगीता गीते संजय जोशी, ज्ञानेश्वर वाडगे, रमेश डोळे, अभिनव वाणी, तुषार वाणी,
राहुल वाणी, जालिंदर वाणी, मंगेश व्यवहारे,श्रीकांत दाभाडे, अनिल वाणी, साहेबराव अनाप, नारायण धनवट,अशोक अंत्रे, पाराजी धनवट,बाबासाहेब व्यवहारे, जाहूर शेख,अनुप कदम, सरपंच अशोक खेमनर, डॉ. रमेश वाणी, सोमनाथ नाईकवाडी, स्वप्निल वाणी,प्रा. प्रकाश सिनारे,शिवाजी वाकचौरे, बाळासाहेब डोळे, रामनाथ वाणी, भाऊसाहेब व्यवहारे पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे संगणमेर,अश्विनी बँक संचालक सखाहारी नागरे ,नवाब चंदुलाल शेख, उद्योगपती ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर नागरे, शेडगाव सोसायटीचे चेअरमन अशोक नामदेव फड, विजयराव कहार आदींनी अभिनंदन केले आहे.
या कामामुळे परिसरातील संपर्क व्यवस्था अधिक सुलभ होणार असून विकासाला नवे आयाम मिळतील, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.त्यांचे अनेक स्थानिक मान्यवरांनी मनापासून आभार मानले असून या कामामुळे परिसराच्या विकासाला गती मिळेल,असा विश्वास व्यक्त केला आहे.
