नाशिक दिनकर गायकवाड त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बरड्याची वाडी वावीहर्ष पाड्यावर राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने तब्बल १४ मुलांना जन्म दिला. मुलांपैकी दीड महिन्याच्या बाळासह सहा मुले विकल्याचा संशय आशासेविकेने उपस्थित केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून पैशांसाठी पोटच्या मुलांना विकल्याने शासकीय यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहे.
बच्चुबाई हंडोगे या ४५ वर्षीय महिलेला तब्बल १४ मुले आणि मुली झाल्या. यापैकी सहा हून जास्त मुला मुलींची पैशासाठी विक्री झाल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. १० ऑक्टोबर २०२५ रोजी या महिलेला मुलगा जन्माला आला.
मात्र त्याचे वजन कमी असल्याने आरोग्य विभागाकडून या नवजात बाळाच्या आरोग्याची तपासणी आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या महिलेच्या घरी सुरू होती. या महिलेला मुलाचे संगोपन होत नसल्याने ते मूल तिने विकल्याची माहिती अशा सेविकेसह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली.
ज्यावेळी या मुलाची आरोग्य तपासणी करण्यासाठी स्थानिक आशा सेविका नेहमीप्रमाणे गेली त्यावेळी तिला या महिलेने तिचे नवजात बाळ विकल्याचा संशय आला आणि या आधीचे देखील दोन ते तीन लहान मुले आणि मुली विकल्याची माहिती समोर आली. मात्र ज्या आदिवासी पाड्यावर हा संपूर्ण प्रकार घडला.
आशा सेविकेने नेहमीच्या तपासणी दरम्यान या बाळाच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात कुमावत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
तपासणी करण्यासाठी बाळ कुठे असे विचारले तेव्हा ते बाळ देऊन टाकले, असे उत्तर बाळाच्या आईकडून मिळाले. या आधी देखील दोन ते तीन वेळा अशाच घटना घडल्याने अंगणवाडी आशा सेविकेचा लहान बाळ विकून टाकल्याचा संशय वाढला आणि तात्काळ वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणात डॉक्टरांकडून देखील घटनेची माहिती मिळताच चौकशी सुरू करण्यात आली.
घडलेल्या प्रकारामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना देखील ही माहिती मिळाली. कोणतीही मदत या महिलेला मिळाली नाही आणि आर्थिक अडचणीमुळे बाळाचे संगोपन न झाल्याने जन्मदात्या आईनेच बाळ विकल्याचा संशय व्यक्त करत आरोग्य विभागाच्या अकार्यक्षम कृतीने जन्मदात्या आईवर नवजात बाळाला विकल्याची वेळ आली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.
पैशासाठी मुलाची विक्री केल्याच्या घटनेनंतर प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना बच्चूबाई हंडोगे या महिलेचा शोध घेतला. मात्र पैशासाठी नाही तर हलाकीचे जीवन जगत असताना बाळाचे आजारपण आणि त्याला दूध मिळत नसल्याने हे बाळ आम्ही नातेवाईकांना दिले. दत्तक म्हणून हे बाळ आम्ही दिले या आधी देखील आमच्या नातेवाईकांमध्ये बाळ सांभाळण्यासाठी दिल्याचा खुलासा बच्चुबाई हंडोगे आणि विष्णू हंडोगे या दाम्पत्याने केला.
बाळाला विकले नाही तर नातेवाईकांना दत्तक दिल्याची कबुली या बाळाच्या आई-वडिलांनी दिली. मात्र कोणतेही औषधोपचार बाळाला मिळाले नाही. गरोदरपणात कोणतीही आवश्यक घ्यावयाची काळजी आरोग्य विभागाने घेतली नाही. अंगणवाडीतून गरोदरपणात आणि बाळ झाल्यानंतर मिळणारी मदत मिळाली नाही, त्यामुळे बाळाला पोषक दूध देऊ न शकल्याने हे दीड महिन्याचे बाळ दत्तक नातेवाईकांना सांभाळण्यासाठी दिल्याचे सांगितले.
या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून समिती देखील गठीत करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. घोटी पोलिसांकडून तत्काळ या मुलांचा शोध घेण्यासाठी तीन पथके शहापूर, ठाणे आणि इतर भागात रवाना करण्यात आली आहे.
