अशोका मार्गावरील शुभ सोसायटीत दोन महिलांची मंगळसूत्रे हिसकून केला पोबारा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड सोसायटीच्या लिफ्टजवळ उभ्या असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे मोपेडवरून आलेल्या अज्ञात इसमाने बळजबरीने खेचून नेल्याची घटना अशोका मार्ग येथे घडली.
फिर्यादी सुशीला रामदास खाडे (रा. शुभ अपार्टमेंट, अशोका मार्ग, नाशिक) या सोसायटीच्या लिफ्टजवळ उभ्या होत्या. त्यावेळी मोपेडवरून आलेल्या अनोळखी इसमाने खाडे यांच्या गळ्यातील ६४ हजार रूपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५६ 

हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स व वेल बळजबरीने चोरून नेले, तरोध त्या परिसरात लेन नंबर १, कल्पतरूनगर येथे प्रिशा उदय वासवानी या महिलेच्यादेखील गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉक्ट मोपेडस्वाराने बळजबरीने खेचून चोरून नेले. या दोन्ही चोऱ्यांप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!