दोन मैत्रिणींच्या फोटो खाली जातिवाचक शिर्षक देऊन व्हायरल करत बदनामी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड इन्स्टाग्राम स्टेटसवर दोन मैत्रिणींचे फोटो अपलोड करून जातिवाचक व बदनामीकारक मजकूर प्रसारित करून बदनामी केल्या प्रकरणी सिनरच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्रोफाईलवर आरोपी महिला दीप्ती (रा. सिन्नर, जि. नाशिक) हिने बनावट इन्स्टाग्राम प्रोफाईल   उघडले त्यावर फिर्यादी व त्यांची मैत्रीण हिचे त्यांच्या वैयक्तिक इन्स्टाग्रामवर ऑक्टोबर २०२५ स्टोरी स्टेटसवर अपलोड केलेले फोटो कॉपी करून घेतले.
 
कॉपी केलेल्या फोटोवर नमूद बनावट इन्स्टाग्रामवर अपलोड केले व त्या फोटोखाली जातिवाचक, बदनामीकारक मजकूर प्रसारित करून फिर्यादी व साक्षीदार या दोघांची ऑनलाईन बदनामी केली.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात बनावट इन्स्टाग्राम प्रोफाईलधारक वापरकर्ता दीप्ती नामक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिसे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!