पिंपारणे येथील विकास कामे शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री विखेंची ग्वाही
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यात जे चाळीस वर्षात झाले नाही ते महायुती सरकारच्या माध्यमातून एक वर्षात झाले आहेत.भविष्यात तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी जमीन उपलब्ध करा उद्योग आणण्याची जबाबदारी मी घेतो आशी ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी दिली.
पिंपरणे येथे सुमारे ८ कोटी रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होत असलेल्या विकास कामांचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पा.आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.बापुसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गोकुळ दिघे,संतोष रोहम मंजाबापू साळवे,संदीप घुगे,अशोक खेमनर, माजी सभापती अंकुश कांगणे, गुलाब भोसले, रामभाऊ राहणे नारायण मरभळ सरपंच प्रीती दिघे सरपंच सविता शिंदे बाबासाहेब शिंदे राजेंद्र वर्पे राहुल दिघे,स्वप्निल वाणी,बलराज पाटील , सोमनाथ डोळे तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात बोलताना मंत्री विखे पुढे म्हणाले की राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया पुढे जात आहे.या विकास प्रक्रियेत तालुका कुठे कमी पडणार नाही याची काळजी घेत आमदार अमोल खताळ निधीची उपलब्धता करुन आणत आहेत.कामाचे श्रेय कोण घेतय यापेक्षा काम कोण करीत आहे जनतेला माहीत आहे.कितीही फ्लेक्स लावू द्या!तालुक्यातील जनतेच्या मनात महायुतीच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
तालुक्यात सध्या कोणते इंजिन कोणत्या डब्यांना जोडले आहेत हे समजायला तयार नाही.रेल्वे पळवल्याचे आरोप करणाऱ्यांनी आधी प्रकल्प कोणाच्या काळात बदलला हे एकदा सांगावे.मी तर पुणे नासिक रेल्वे संगमनेर मार्गेच नेण्याच्या मागणीवर ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडेही जाणार असल्याचे मंत्री विखे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करताना तालुका सुध्दा आपल्याला पाणीदार करायचा आहे. वर्षानुवर्ष दुष्काळ पाहाव्या लागलेल्या गावांना निळवंडे धरणाच्या माध्यमातून दिलासा मिळाला.साकूर पठार भागातील सहा उपसा सिंचन योजनेच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असून त्याची कार्यावही लवकर होईल असे सांगून भोजापूर चारीच्या कामाला ४४कोटी कोटी रुपयांचा निधी यापुर्वीच मंजूर झाला आहे.भंडारादरा धरणाच्या पाण्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाचा आहे.या माध्यमातून जी गावे पाण्यापासून वंचित राहीली आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम निश्चित होईल असे मंत्री विखे पा. म्हणाले.
तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने भविष्यात आपल्याला काम करायचे आहे.शिर्डीत झाले तसे औद्यगिक विकासाचे काम तालुक्यात उभे करायचे आहे.जागेची उपलब्धता करा उद्योग आणण्याची जबाबदारी माझी राहील आशी ग्वाही मंत्री विखे पा. यांनी यावेळी दिली.
आमदार अमोल खताळ यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आमदार झाला हे काहीना सहन होत नाही.त्यामुळेच फक्त व्यक्तिगत बदनामी करून कामात खोडा घालण्याचा प्रयत्न होत आहे.पण मायबाप जनता माझ्या आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून पालिकेच्या पराभवाने आम्ही खचलो नाही. तिसऱ्या दिवशी आम्ही जनतेत जावून काम सुरू केले.पालिकेत धनशक्तीने कसा विजय मिळवला हे जनतेला सुध्दा माहीत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात दुष्काळी भागाला पाणी आले.आता रोजगार आणि रस्ते विकासाचे जाळे निर्माण करायचे आहे.विधानसभेला अकार्यक्षमता असलेल्या लोकांना घरी बसवून जनतेन इतिहास घडवला.त्याची पुनरावृती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घडविण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.याप्रसंगी बापुसाहेब देशमुख यांनी संगमनेर कारखान्याच्या उभारणीचा इतिहास सांगून पद्मश्रीनी केलेल्या सहकार्याची आठवण सांगितली.शेतकरी नेते संतोष रोहोम यांनी महाविकास आघाडीच्या काळातील दूध अनुदानाची चौकशी करण्याची मागणी केली.
