लोणी बुद्रुकचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यात आदर्श मॉडेल-पालकमंत्री विखे पाटील

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने विकसित केलेला अत्याधुनिक  घनकचरा प्रकल्प राज्यात  विकसित होत असलेल्या गावांसाठी आदर्श माॅडेल ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी व्यक्त केला.
गोगलगाव येथे लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने कार्यान्वित केलेल्या घनकचरा प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ.शालिनी विखे पा.डॉ विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तहसिलदार अमोल मोरे गटविकास अधिकारी विवेक गुंड अध्यक्ष नंदू राठी व्हा उपाध्यक्ष सोपान शिरसाठ प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छीद्र थेटे सरपंच कल्पना मैड दतात्रय राजभोज भाऊसाहेब खाडे अनिल विखे यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

सुमारे चार कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आलेला अत्याधुनिक स्वरुपात निर्माण झालेला घनकचरा प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर उभारलेला पहीला प्रकल्प आहे.ग्रामीण भागात केलेला पहीला यशस्वी प्रकल्प असून विकसित होत असलेल्या गावांसाठी एक आदर्श माॅडेल असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी केला.

ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे प्रकल्प पूर्ण होत असल्याचे समाधान व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,शहर आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या जशी वाढत आहे तशी कचऱ्याची समस्या आव्हान म्हणून उभी राहाणार आहे.परंतू आशा नव्या तंत्रज्ञानाची जोड देवून प्रकल्प साकार झाला असला तरी त्याला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न होतील.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने नेहमीच शासनाच्या सर्व धोरणांची योजनांची यशस्वी अंमलबजावणी माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकारने केल्यामुळेच राज्य आति देश पातळीवरच्या पुरस्काराने या ग्रामपंचायतीचा सन्मान झाल्याची सर्वासाठी अभिमानाची असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

लोणी बुद्रुक गावात विकसित झालेले मटण मार्केट सर्व सुविधांनी परीपूर्ण झाले असून दोन एसटीपी प्लॅन्ट उभारण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

अध्यक्ष डॉ सुजय विखे  यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाच्या उभारणीचा सविस्तर आढावा घेवून या प्रकल्पाचा कोणत्याही गावाला त्रास होणार नाही.नागरीकांकडे साठणारा कचरा उचलून प्रक्रीया केंद्रावर आणण्यापर्यत सर्वाना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कचऱ्यापासून तयार होणारे खत स्थानिक शेतकऱ्यांना कमी भावाने उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!