पोलिसांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल- नामदार कदम
संगमनेर प्रतिनिधी संगमनेर शहर आणि परिसरात होत असणाऱ्या अमली पदार्थाचा पुरवठा, तस्करी व विक्रीबरोबरच सुकेवाडी येथील सर्वात मोठ्या गांजा तस्करी या महत्त्वाच्या प्रश्नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी आवाज उठवत विधिमंडळाचे लक्ष वेधले आणि सुकेवाडी व इतर ठिकाणच्या अमली पदार्थ कारवाईमधील दोषींवर कठोरा तील कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार खताळ यांनी केली त्यावर दोषींवर कारवाई केली जाईल असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
संगमनेर मतदारसंघातील सुकेवाडी येथे नाशिक विभागीय अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तसेच शहर पोलीस पथकाने छापा टाकून ४५६ किलो गांजा जप्त केला आहे.या प्रकरणातील तुषार उत्तम पडवळ पसार झाला आहे असून त्याच्या घरा जवळच छोटा हत्ती टेम्पोमध्ये गांजा सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथील विधिमंडळात आवाज उठवत संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात अंमली पदार्थांचा पुरवठा,तस्करी व विक्री करणाऱ्यांचा सखोल तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांचे विशेष पथक नेमावे.या अवैध धंद्यांना राजाश्रय कोण देतेय याचा देखील तपास करावा.आणि यात जे कोणी दोषी आहे.
अशा दोषींवरती अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोरातील कठोर कारवाई करावी.अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली त्यावर उत्तर देताना या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल असे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधिमंडळात सांगितले.
-संगमनेरच्या अंमल पदार्थांना राजाश्रय कुणाचा जनतेला ठाऊक
संगमनेर अमलीपदार्थ अन ड्रग्समुक्त करण्यासाठी तसेच तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी माझा सतत प्रयत्न सुरू राहील.संगमनेरला अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांना राजाश्रय कोणाचा आहे हे आता जनतेला समजू राहिले आहे.आमच्या कार्यकाळात आता कारवाया होत राहणार त्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही.ड्रग्ज आणि गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी फोटो व्हिडिओ मधून स्पष्ट दिसत आहेत ते कोणाचे कार्यकर्ते आहेत.
आमदार अमोल खताळ
आमदार,संगमनेर विधानसभा
