संभाजीनगर प्नतिनिधी शहरातील सिमंत मंगल कार्यालय येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष,माले लिबरेशनचे जिल्हा अधिवेशन उत्साहात पार पडले.
प्रसंगी असंख्य कार्यकर्ते आणि सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मिळाला.कोल्हापूरमध्ये होणाऱ्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या जिल्हा अधिवेशनात लढाऊ उर्जा आणि ऐक्याचे दर्शन घडले.
अधिवेशनात कॉम्रेड बुद्धीनाथ बऱ्हाळ, कॉम्रेड बाळासाहेब सुरुडे,कॉम्रेड.मदिना शेख, कॉम्रेड शरद संसारे, कॉम्रेड जीवन सुरुडे आणि कॉम्रेड सोहम बोदवडे यांनी मार्गदर्शन केले.
