९०० कोटींच्या थकबाकीचे महापालिकेसमोर आव्हान
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेने अभय योजनेद्वारे मागील महिन्यात फक्त बाकी वसुलीत सरासरी दहा कोटींची घट झाली आहेत. त्याआधी सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत ७५ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी २८ कोटी रुपये वसूल झाले; मात्र नोव्हेंबरमध्ये निवडणूक कामामुळे कर्मचाऱ्यांचे लक्ष वसुलीकडून हटल्याने केवळ १८ कोटी रुपयेच जमा झाले, म्हणजेच सरासरी १० कोटींची घट झाली.
महापालिकेवर सध्या सुमारे ९०० कोटींच्या थकबाकीचे मोठे आव्हान आहे. शास्तीचीच रक्कम ३८७ कोटी तर नियमित घरपट्टी थकबाकी ६०० कोटींच्या घरात आहे. अभय योजनेत यापूर्वी ९५ टक्के सवलत होती; डिसेंबरपासून ती ८५ टक्क्यांवर येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासह विकासकामांसाठी निधी उभारण्याची गरज वाढल्याने थकबाकी
सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात थकबाकीवर ९५ टक्के सुट देण्यात आली होती. आताही ८५ टक्यांची सुट देण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी याचा लाभ घेऊन नाशिक महापालिकेला सहकार्य करावे. थकबाकीकडे पाठ फिरवणाऱ्यांवर आयुक्तांच्या आदेशाने कारवाई केली जाईल.
अजित निकत, उपायुक्त, करविभाग, मनपा, नाशिक.
वसुलीला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नाशिक महानगरपालिकेच्या नोंदीप्रमाणे शहरात ५.८३ लाख मिळकती व २.१२ लाख पाणीपट्टीधारक असून वसुली वाढवण्यासाठी बिलवाटपाचे काम आउटसोर्सिंगद्वारे सुरू आहे. एप्रिल-जून करसवलत योजना आणि ऑक्टोबर-जानेवारी अभय योजनेतून दरवर्षी वसुली वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. थकबाकीदारांनी सवलतीचा लाभ घ्यावा;अन्यथा कारवाई केली जाईल, असे आवाहन उपायुक्त अजित निकत यांनी केले आहे.
