यावेळी केले १४ जानेवारी २०२६ संकल्पित रिपाई पक्षाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.तसेच या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या क्रांतिकारी लढ्यात योगदान दिलेल्या महाराष्ट्रातील अकरा स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे असे प्रकाश पगारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या बैठकीत राजाभाऊ समशेर यांची चर्मकार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी तर संजय पवार यांची नाशिक जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्षपदी व तुषार तथा नाना पगारे यांची नाशिक शहर युवक आघाडी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या बैठकीचे सूत्रसंचालन संपर्कप्रमुख हनुमंतराव काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणपत तिवडे यांनी केले. बैठकीस विभागीय अध्यक्ष संजय सानप,अर्जुन समशेर सौ.रमा जाधव, रवींद्र लोखंडे संजय बेंडकुळे,विनोद शेळके,सुरेश आहिरे रमेश खलसे, सुदाम गामने,अनाजी खांडेकर सपना काळे, पल्लवी बहुलेकर ,डॉ. सुभाष काळे,संतोष के.जी ,प्रकाश अहिरे सह जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
