संगमनेर राहुरी शिबलापुर मार्गाची बस त्वरित सुरू करण्याची नागरिकांची मागणी

Cityline Media
0
दाढ खुर्द किशोर वाघमारे आगारातून नियमितपणे सुटणारी संगमनेर राहुरी शिबलापूर मार्गाची बस त्वरित सुरू करण्याची मागणी येथील शेतकरी वर्गासह नागरिक विद्यार्थ्यांनी केली आहे संगमनेर तालुक्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दाढ खुर्द झरेकाठी शिबलापूर परिसर हा ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असून या भागामध्ये संगमनेर शिबलापुर मार्गाची राहुरी बस गेल्या पाच वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली गेली अनेक वर्ष सुरू असणारी बस संगमनेर  आगराने गेली पाच वर्षापासून बंद केली आहे.
बस बंद झाल्यामुळे या परिसरातील नागरिक वर्गासह विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठी नुकसान होत असून या परिसरातील अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना बसच्या सहाय्याने संगमनेर शहराकडे व राहुरी कडे ये जा करावी लागते परंतु बसत नसल्याने तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

संगमनेर राहुरी ही बस गेली  पंचवीस वर्षापासून अगोदर सुरू होती त्यामुळे नागरिकांना दाढ झरेकाठी खळी पिंप्री चनेगाव येथून संगमनेर येथे दवाखान्याच्या कामासह तहसील कार्यालय अन्य इतर शासकीय कार्यक्रमासाठी नागरिकांना संगमनेर येथे जाणे येणे करावे लागते.

परंतु ही बस बंद झाल्यामुळे येथील विद्यार्थी वर्ग महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक शासनाच्या विविध सुविधा असूनही सवलती पासून त्यांना वंचित राहावे लागते व सर्वांची प्रवासाची मोठी तारांबळ होते त्यामुळे नागरिकांच्या अडचणी समजून संगमनेर आगार प्रमुखांनी येत्या पंधरा दिवसांत शिबलापूर मार्गाची संगमनेर राहुरी बस त्वरीत सुरू करावी.

अन्यथा येथील प्रवासी वर्ग रस्ता रोको आंदोलन संगमनेर बसस्थानक विरोधात तीव्र आंदोलन करील असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे आमदार अमोल खताळ यांना दिले आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!