खळी,दाढ खुर्द परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने दिवसा वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Cityline Media
0
दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील खळी दाढ खुर्द परिसरात बिबट्या व अन्य हिंस्र श्वापदांचा संचार वाढल्याने येथील शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
दाढ खुर्द व खळी हा परिसर मोठ्या प्रमाणात शेती असून बागायती परिसर म्हणून ओळखला जातो या परिसरामध्ये सध्या रब्बी हंगामामध्ये गहू हरभरा मकाचीवाढ झाली असून ऊस लागवड असे महत्त्वाचे पिके व कांदा यासारखे महत्त्वाचे पिके शेतकऱ्यांनी घेतल्याने त्यांना रात्रीचे पाणी भरणे कठीण जाते.

या भागांमध्ये बिबट्या रानडुक्कर अशा वन्य प्राण्यांचे संख्या मोठी असल्याने त्यांचा दिवसा संचार दिसत असून रात्री तर ते राजरोस शेतकऱ्यांच्या घराच्या अवतीभवती भक्ष्याच्या शोधत फिरत असतात त्यातच अलीकडल्या काळामध्ये येथील बिबट्याने लहान मुले दुचाकी स्वार कालवडी कुत्रे यासारख्या प्राण्यावर हल्ला चढवला आहे.

झालेल्या घटनांमुळे येथील शेतकरी खूप घाबरलेला आहे येथे शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी दिवसा वीज दिली तर शेतकऱ्याला शेतीला पाणी भरणे सोपे होईल अन्यथा येथील शेती अडचणीतील व शेतकरी कर्जबाजारी होईल त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्याचे अडचण समजून त्वरित दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी काँग्रेसचे गटनेते किशोर जोशी नितीन पाबळे ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब जमदाडे चेतन पर्वत दाढ खुर्दच्या उपसरपंच सौ. राजश्री सुनील जोशी आदी प्रमुख शेतकरी कार्यकर्त्यांनी केले आहे.               छाया-रेखांकन प्रकाश कदम 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!