दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद परमार्थ मिळवून देतो-गोकुळ जेजुरकर

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम मनुष्याला आयुष्यात धर्माची आणि कर्माची सांगड घालता आली पाहिजे.आपण आयुष्यात किती संपत्ती कमवतो यापेक्षा त्या संपत्तीचा विनियोग चांगल्या कारणासाठी झाला तर नक्कीच पुण्याई ची शिदोरी आयुष्याला जोडली जाते.दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण करावयाचा असेल तर सातत्यपूर्ण दिव्यांगा बाबतीत सामाजिक बांधिलकी जपून दिव्यांगाप्रती संवेदनशीलता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.दिव्यांगाच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला परमार्थ मिळवून देतो असे प्रतिपादन दिव्यांग विद्यार्थ्यांना टी-शर्ट वाटप कार्यक्रम प्रसंगी गोकुळ जेजुरकर यांनी श्रीरामपूर येथे केले.
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कु.साक्षी जेजुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना व दिव्यांग बांधवांना टी-शर्ट,पेन,मास्क व बिस्कीट वाटप करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी जिल्हा व्यवस्थापन शासकीय समितीचे सदस्य संजय साळवे,मूकबधीर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक रामदास रासकर,.गोकुळ जेजुरकर,कु.साक्षी जेजुरकर,सौ.सविता जेजुरकर, सुमित जेजुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी अपंग  सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,चंद्रकांत सांगळे,दीपक तरकासे,कैलास बनकर,सुरज गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले.तर आभार दीपक तरकासे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!