त्र्यंबकेश्वर मधील विद्यार्थी-शिक्षकांप्रती सद्भावना कृती ठरली कौतुकास्पद
नाशिक दिनकर गायकवाड अमळनेर नाशिक ग्रामिणचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा.वासुदेव देसले यांनी आपल्या संवेदनशील,कर्तव्यदक्ष आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्यातून पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श घालून दिला आहे.त्यांच्या या सत्शील कृतीचे कौतुक होत आहे.
अमळनेर तालुक्यातील जी.एस.हायस्कूल,अमळनेर येथील शिक्षक,चालक व तब्बल ९० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहल गट त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी गेलेला असताना,पोलिस अधिकारी देसले यांनी स्वतःपुढाकार घेत सर्वांशी आपुलकीने हितगुज केली विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नाश्ता व पाणी देत,त्र्यंबकेश्वर देवाचे दर्शन तात्काळ व सुलभ पद्धतीने होईल,यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले,आपल्या व्यस्त शासकीय वेळेतूनही त्यांनी दिलेला हा अमूल्य वेळ उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला,
प्रसंगी पोलिस अधिकारी श्री.देसले यांच्या सोबत पोलिस अधिकारी भानुदास बोरसे (सोनखेडीकर) यांनी देखील सहकार्य करत विद्यार्थ्यांचे दर्शन लवकरात लवकर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले.या प्रेमळ व तत्पर सहकार्याबद्दल जी.एस. हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांची कृतज्ञता व्यक्त केली.
अधिकारी वासुदेव देसले हे केवळ एक कर्तव्यदक्ष अधिकारी नसून,अमळनेर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणीसाठी सदैव धावून येणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व माणून ओळखले जातात.तालुक्यातील कोणाचाही प्रश्न असो,तो सोडवण्यासाठी श्री.देसले नेहमीच सहकार्याची भूमिका घेतात.
यापूवीही अमळनेर संत गजानन महाराज परिवारातील पंधरा महिला भगिनी त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गेल्या असता त्यांना दर्शन मिळाले नव्हते.त्या वेळी महिलांनी पत्रकारांशी संपर्क साधला,पत्रकारांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधून सर्व महिलांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करून दिली. दर्शनानंतर अधिकारी देसले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य तसेच लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमा देसले यांनी सर्व महिलांना प्रेमाने चहा,पाणी व जेवण देऊन सन्मानपूर्वक रवाना केले होते.
