वडगाव शेरीत श्रीरामपूरचे डॉ. सलीम शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान

Cityline Media
0
मानवी कल्याणासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करणे हेच कर्तव्य-डॉ.सलीम शेख

श्रीरामपूर दिपक कदम पुणे येथील गुरुकुल सेवा भूषण पुरस्कार सोहळ्यात गुरुकुल विश्वपीठ वडगांव शेरी येथे गुरुकुल विश्वपिठाचे कुलगुरू ईश्वरप्रिय डॉ.अजयचंद्र भागवत गुरुजी यांनी आयोजित केलेल्या गुरुकुल सेवा भूषण पुरस्कारला विविध स्थरातील सामाजिक काम करणाऱ्या विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रीरामपूरचे प्रसिद्ध समाजसेवक डॉ सलीम सिकंदर शेख,डॉ.नितीन वाघमारे,श्री मनोहर कोलते,विजय शिवले, पूर्णिमा गदीया जी, सौं लता शिंदे, सौं.निर्मला अय्यर, प्रशांत कदम व्यक्तींना सन्मान व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्याचप्रमाणे गुरुकुल विश्व पिठाचे कुलगुरू डॉ भागवत गुरुजीचा वाढदिवस ही होता, त्यांना तेथे जमलेल्या गुरुजींच्या विविध स्थरातील भक्त व विद्यार्थी नीं गुरुजींना उदंड आयुष्य च्या निरोगी शुभेच्छा ही दिल्या. तेथील वातावरण गुरुकुलमय अध्यात्मिक वातावरणात हा अविस्मरणीय सोहळा पार पडला.

या सोहळ्यात श्रीरामपूर व पुणे शहरातील असंख्य स्त्रिया पुरुषांनी उपस्थिती दर्शविली श्रीरामपूर येथील अभियंता राजू पठाण, राजू सिकंदर शेख,ताज पठाण,पुणे येथील जमातचे फरझाना बाजी, रेहाना शेख, समाजसेवक फरहान शेख, मोंटू खान, सुफियान शेख व असंख्य प्रामुख्याने उपस्थिती होतें.सत्काराला उत्तर देतांना आपल्या भाषणात डॉ. सलीम शेख यांनी सांगितले की "मानव कल्याणासाठी सर्वांनी आप आपल्या परीने कमीत कमी काहीतरी आपल्या कडून प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहेत.."
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!