संगमनेर किशोर वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाची संगमनेर येथील हॉटेल सेलिब्रेशन अकोले रोड टेलिफोन ऑफिस समोर पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस तुकाराम जाधव यांनी दिली आहे.
या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात तसेच राहुरी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या वतीने उमेदवारीची चाचपणी करणे
जुन्या कार्य करणे बरखास्त करून नवीन कार्यकारणी तयार करणे, जिल्हा तालुका शहर महिला आघाडी नव्याने कार्य करणे जाहीर करणे तसेच पक्ष संघटन वाढविणे गाव तिथे रिपब्लिकच पक्षाची शाखा स्थापन करणे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची घटना गावोगावी समजावून सांगून पक्ष वाढीसाठी काम करणे आदी महत्त्वाच्या विषयावर विचारविनिमय होणारा असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यमान जिल्हा अध्यक्ष सुधाकर रोहम राहणार आहे.बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून सर्व तालुक्यांमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर तालुका कार्यकारिणी केले आहे.
