श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपुरमधील अस्लम शेख उर्फ बंटी जहागीरदार खून प्रकरणी २ आरोपी ताब्यात. रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे अशी हल्लेखोरांची नावे. पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारे तपास करून नाकाबंदीमध्ये रात्री या दोघांना पकडले. त्यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती.
पुणे बॉम्ब स्फ़ोटातील आरोपी असलेल्या बंटी जगागीरदार याची काल श्रीरामपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील कॉलेजरोड परिसरातील कबरीस्तान येथून एका अंत्यविधीवरून परतत असतांना संत लुक हॉस्पिटल परिसरात एका मोटरसायकलवरून आलेल्या ०२ आरोपींनी बंटी जहागीरदार वर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.हि घटना ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. तसेच बंटी जागीरदार समर्थकांचा मोठा जमाव श्रीरामपूर शहरातील कामगार हॉस्पिटल समोर जमा झालेला आहे.मोटारसायकलवरुन आलेले आरोपी कोण होते ? त्यांनी नेमके कोणाच्या सांगण्यावरून गोळीबार केला? याचा पोलीस कसुन शोध घेत आहेत.
