प्रिंप्री लौंकी आजमपूर,आश्वी खुर्दचे श्री.क्षेत्र मोठेबाबा यात्रोत्सव आजपासून सुरू

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्याच्या पुर्व भागातील पिंप्रीं लौकी अजामपुर व आश्वी खुर्द गावचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. क्षेत्र मोठेबाबाचा यात्रोत्सव आज गुरुवार पासुन सुरु होत असल्याची माहिती यात्रा कमेटीचे अध्यक्ष प्रा.कान्हु गिते यानीं दिली आहे.
आश्वी खुर्द व पिंप्री गावाच्या सिमेवर शिबलापुर गुहा रस्त्या लगत उंच डोंगरावर मोठेबाबाचें भव्य असे मंदिर असुन येथील ग्रामस्थ पुर्वीपासुन येथे दरवर्षी मोठा यात्राउत्सव आंनदाने साजरा करतात. आज गुरुवार दि. ८ जानेवारी ते उद्या शुक्रवार दि. ९ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यात्रेनिमित्त  छबिणा मिरवणुक काढून फटाक्याची आतषबाजी  तर मोठेबाबा परिसरातील विविध देवदेवतांना नारळ वाढविणे चादर अर्पण करण्यात येणार आहे त्यांनंतर नैवद्य व होईकाचा कार्यक्रम तर रात्री ८ वा निलेश अहिरेकर नारायणगाव यांचा मोफत लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले असुन शुक्रवार दि. ९ रोजी सकाळी ९ ते १२ हजऱ्या तर  दुपारी ४ ते ६.३० जंगी कुसत्याने यात्रेची सांगता होणार आहे. 

येणाऱ्या भाविकासाठी भव्य पार्किगची व्यवस्था केली असून  शुक्रवारी होणाऱ्या जंगी हंगाम्यासाठी प्रशस्त मैदानाची उभारणी केली आहे.त्यामुळे पंचक्रोशीतील नागरीकानी या यात्रोत्संवाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा.असे आवाहन यात्रा कमेटी चे अध्यक्ष प्रा.कान्हु गिते व पिंप्री लौकी अजामपुर तसेच आश्वी खुर्द ग्रामस्थानी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!