झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील
झरेकाठी येथे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विखे यांच्या विविध उपकरणातून अनेक योजना राबवत असतो श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग लोणी प्रवरा यांच्या उपक्रमातून राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प अंतर्गत झरेकाठी गावामध्ये नुकतेच आरोग्य शिबीर घेण्यात आले.
छाया सोमनाथ डोळे
या शिबिरात विविध आजारांचे निदान करून योग्य ते मोफत उपचार करण्यात आले या शिबिरामध्ये वैद्यकीय विभाग कान नाक घसा विभाग अस्थिरोग विभाग डोळ्यांचे आजार व दातांचे विकार यावर उपचार करण्यात आले या उपक्रमासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस पी जगदाळे ,
प्राचार्य डॉ. राजेंद्र लामखडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रसाद तांबे व सहकारी शिक्षक दादासाहेब जेऊघाले,अंकित निबे, कॉलेजचे ऐ वो विजय आहेर ,वैद्यकीय विभागाचे सर्व डॉ. नूतन कहार, डॉ.प्रज्वल झोरे, इ एन टी विभागाचे डॉ. पटेल, दंत विभागाचे डॉ. प्राची गडाख,
डॉ. यशोधन अस्थिरोग तज्ञ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व विद्यार्थी व झरेकाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी केली २५० हून अधिक रुग्णांनी तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमासाठी झरेकाठी गावचे सरपंच तसेच सर्व सदस्य व ग्रामस्थ झरेकाठी यांचे हा कार्यक्रम घेण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
