श्रीरामपूर दिपक कदम शहरातील डीडी काचोळे माध्यमिक विद्यालय व विद्यार्थी वस्तीगृह येथे गोरगरीब विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऐ चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचे कट्टर समर्थक प्रदीप मकासरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृहाचे अध्यक्ष भराड होते. तसेच गुरुकुल प्रमुख उपनिरीक्षक रवींद्र निकम, परिविक्षाधीन अधिकारी सूर्यकांत सराटे, युवक जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे, अलोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना प्रदीप भाऊ मकासरे यांनी गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. सामाजिक बांधिलकीतून असे उपक्रम पुढेही राबवले जातील, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॅकसूटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी आयोजकांचे आभार मानले.
