नाशिक दिनकर गायकवाड सिडको परिसरातील वेगवेगळ्या भागांत एका तरुणीसह एक इसम आणि तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
आत्महत्येचा पहिला प्रकार शिवशक्ती चौकात घडला. छकुली भास्कर गवळी (वय २२) या तरुणीने राहत्या घराच्या किचनमध्ये फॅन अडकवण्याच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. यात ती बेशुद्ध झाल्याने तिला सिव्हिलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
आत्महत्येचा दुसरा प्रकार दत्तनगर येथे घडला. संजय नागेश्वर सिंग (वय ५७ अंबड) यांनी काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी कापडी पट्टी जिन्याला बांधून गळफास घेतल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना पुढील उपचारासाठी त्यांचा
पुतण्या विश्वजित सुनील सिंग याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.डॉक्टरांनी तपासून सिंग यांना मृत घोषित केले.आत्महत्येचा तिसरा प्रकार सिंहस्थनगर येथे घडला. अनिल राजू इंगळे (वय २१, रा. सिडको) या तरुणाने काल (दि. १०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
त्यामुळे बेशुद्ध झाल्याने त्याचा भाऊ रवी राजू इंगळे यांनी त्याला औषधोपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या तीनही आत्महत्यांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आली असून,पुढील तपास अनुक्र मे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टोपले,पोलीस हवालदार झोले व पोलीस हवालदार देशमुखव करीत आहेत.
