संविधानाच्या तत्त्वांची जाणीव ठेवून जनतेला केंद्रस्थानी ठेवणे हाच खरा प्रजासत्ताक-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Cityline Media
0
ठाणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क संविधानाने दिलेल्या न्याय, अधिकार व स्वातंत्र्याची जाणीव ठेवून जनतेला केंद्रस्थानी ठेवणे हेच खरे प्रजासत्ताक.आपल्या लोकशाहीचा हा उत्सव आहे.
मराठी अस्मितेचा गौरव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमांना गती देणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान,ठाणे येथे ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक, आमदार संजय केळकर, 

रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण,पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी,अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!