लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी-उपमुख्यमंत्री अजित पवार

Cityline Media
0
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क भारतीय संविधानाच्या बळावरच विविध भाषा,धर्म,जाती व संस्कृती असलेला भारत देश जगातील सर्वात मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे.
समता,स्वातंत्र्य,बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज पुणे येथील पोलीस संचलन मैदानावर उत्साहात पार पडला.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!