पैसे देण्यास नकार दिला म्हणून दुकानाची काच फोडून वार

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दुकान बंद करत असताना पैसे मागणाऱ्या तरुणास पैसे दिले नाही म्हणून त्याने दुकानाची काच फोडून नुकसान केले.तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी धिरज रत्नाकर सोनार (रा. स्वामी विवेकानंदनगर, समृद्ध पॅलेस, मखमलाबाद) यांचे मखमलाबाद गावात प्रंजल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोनार हे १६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकान बंद करत होते.

त्यावेळी आरोपी रामकुमार गंगानाथ झा उर्फ चुंडी (रा. मखमलाबाद, नाशिक) हा दुकानात आला. व सोनार यांच्याकडे पैशांची मागणी करु लागला. त्यावर फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला.त्याचा राग आल्याने आरोपी रामकुमार याने सराफी दुकानाची काच फोडून नुकसान केले.

फिर्यादी यांच्या हातावर काच मारुन दुकानातील बॅनर फाडले व मारुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार गवारे करीत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!