तुळापूर जिल्हा परिषद शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात

Cityline Media
0
झरेकाठी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळापूर या शाळेत नुकताच हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ माता गट,राणी लक्ष्मीबाई माता गट व कल्पना चावला माता गट या माता गटांचे उद्घाटन करण्यात आले.तसेच माता पालकांना विद्यार्थ्यांचे आरोग्य,आहार, स्वच्छता व सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांनी स्वतःसाठी वेळ द्यावा व स्वतःचे छंद जोपासत विद्यार्थ्यांचे जीवन फुलवण्यासाठी सदैव तत्पर व जागरूक राहावे यासाठी मुख्याध्यापक वैष्णव संतोष यांनी मार्गदर्शन केले.समाजाचा शाळेतील सहभाग वाढवावा यासाठी आवाहन केले.

विविध स्पर्धा परीक्षा व घरचा अभ्यास याबाबत सहशिक्षिका श्रीमती दुबे योगिता  यांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी महिलांनी संगीत खुर्ची व चमचा लिंबू या स्पर्धांचा मनसोक्त आनंद घेतला.संगीत खुर्ची स्पर्धेत सौ गीता मच्छिंद्र सांगळे तर चमच्या लिंबू स्पर्धेत सौ रेणुका रामराव साबळे या विजेत्या ठरल्या.

विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश हारदे,सरपंच दादासाहेब  हारदे, पंचायत समिती राहुरी माजी सभापती भीमराज हारदे, माधव हारदे, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे , चांगदेव हारदे, सचिन मुसमाडे ,अमोल हारदे,शिवा हारदे,मनोज हारदे उपस्थित होते.

या उपक्रमाचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे ,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नंदा गवळी व केंद्रप्रमुख श्रीमती नीलिमा गायकवाड यांनी कौतुक केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!