मुंबई प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील खळी येथील सामायिक शेती व मुंबई वडाळा आनंदवाडी येथील सामायिक घर वादातून संगमनेरचे पत्रकार किशोर वाघमारे यांच्यावर प्राणघातक झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथे पत्रकार किशोर दादू वाघमारे बांद्रा येथे आजोबांच्या नावे असणाऱ्या वडाळा आनंदवाडी पूर्व मुंबई येथील सामायिक रूमच्या केस संदर्भात बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये सुरू असलेल्या सुनावणीच्या तारखेनिमित्त ते मुंबई येथे गेले.
सुनावणी संपून आत्या भाऊ अजय लक्ष्मण उघडे वडाळा आनंदवाडी येथे भेटण्यासाठी गेले असता सामन्यावाले शेजारी राहणारे सुमन रामदास वाघमारे जोत्सना राजेंद्र जाधव कविता अविनाश वाघमारे रेश्मा महेश वाघमारे महेश रामदास वाघमारे व अविनाश रामदास वाघमारे या पाच जणांनी संगनमताने नियोजनबद्ध कट रचून किशोर वाघमारे हे आत्या भाऊ अजय उघडे यांच्याकडून चहापाणी विचारपूस करून गावाकडे निघाले.
अजय उघडेच्या दारामध्ये वरील सहा जणांनी किशोर वाघमारे यांना धक्काबुक्की करत अंगावरचे कपडे फाडत बॅगेची वर्तड करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला किशोर वाघमारे हे अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील पत्रकार असून ते स्वतःपायाने दिव्यांग असल्याने त्यांना वरील सहा जणांनी ते दिव्यांग असल्याचा फायदा घेत बेदम मारहाण केली.
तू परत येथे दिसला तर तुला कायमचा संपवून टाकू अशी धमकी देत तू न्यायालयातील खटला व संगमनेर आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेली केस मागे घे नाहीतर तुला कायमस्वरूपी संपवून टाकू अशी धमकी देत मारहाण केली.
यावेळी किशोर वाघमारे यांनी १०० नंबरवर फोन केला तात्काळ पोलिसांना बोलवत वडाळा पोलीस ठाणे गाठले व तेथे वरील सहा जण आरोपीच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करत पोलीस ठाण्याकडे कडे मदत मागितली यावेळी वडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांनी तात्काळ सदर घटनेची दखल घेत.
पत्रकार किशोर वाघमारे यांना संरक्षण देत तात्काळ फिर्याद घेत सामन्या वाले यांना तंबी दिली यावेळी किशोर वाघमारे यांनी पत्रकार संरक्षण अंतर्गत पत्रकारावर हल्ला झाल्यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच या अगोदर किशोर वाघमारे यांनी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन तसं वडाळा पोलीस ठाणे यांना वरील सहा जणांपासून जीविताला धोका असल्याची लेखी तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिली होती.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी वरील सहा जणांना चौकशीसाठी बोलविले असता त्याकडे लक्ष न देता त्यांनी पोलीस ठाण्यात न येता किशोर वाघमारे यांना वारंवार मुंबई बंद्रा येथे धमकी देत तुला कायमचे संपू असे बोलत राहिले या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११५/२ ३५२ ३२४ ३(५) भारतीय न्याय दंड संहिता २१!२१ नुसार ने गुन्हा रजिस्टर झाला आहे पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे
