चार वर्षीय शाळकरी मुलीवर मिनी बस मध्ये अत्याचार;बदलापूर सुन्न

Cityline Media
0

बदलापूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क बदलापूरमध्ये मिनी बस चालकाने ४ वर्षांच्या शाळकरी मुलीवर शाळेच्या मिनी बसमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
घडलेल्या घटनेमुळे पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. मिनी बस चालकाने विद्यार्थीनीवर शाळेच्या मिनी बसमध्ये अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता संगीता चेंडवरकर यांनी स्कूल व्हॅनची तोडफोड केली आहे.बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केला आहे. त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे. ही घटना स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती फिर्यादीकडून मिळाली आहे, अशी माहिती एसीपी शैलेश काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!