लोकहित प्रर्वतक पत्रकार;दिनकर गायकवाड

Cityline Media
0
सिटीलाईन न्यूज नाशिक आवृत्तीचे कार्यकारी संपादक दिनकर गायकवाड यांचा प्रेरणादायी प्रवास

हल्लीचे राजकीय लोक 'कार्यकर्ता' हा शब्द वापरू लागल्यापासून ह्या शब्दाची नियोजित बदनामी सुरू झाली.त्याग,प्रामाणिकपणा, आत्मसन्मान, कल्पकता, चिकाटी या गुणांशी या शब्दाची असलेली नाळ तुटली आणि राजाश्रय,लुच्चेगिरी,चमचायुग,गुन्हेगारी, चमकोगिरी,उद्दामपणा,लोचटपणा,यांच्याशी तो जोडला गेला आणि लफंगेगिरी सुरू झाली,शिव-शाहू -फुले- आंबेडकर चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या नाशकाच्या सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील कार्यकर्ता म्हणून जीवन जगणारे ग्रीन पॉवर कंपनीचे मालक दिनकर लक्ष्मणराव गायकवाड यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.
आज तरी सर्वांसाठी कार्यकर्ता हाच शब्द वापरला जातो.दिनकर सर कार्यकर्ता कसे झालो,हे मला नेमके सांगता येत नाही वयाच्या १४ वर्षापासून ते घरातुन बाहेर पडले.लोकांच्या आयुष्यात काही तरी घटना घडते व त्या दिवसापासून ते एका ध्येयाच्या मागे लागतात अगदी तसेच दिनेश सरांच्या आयुष्याचा पट उलगडताना संघर्षच सर्वोतोपरी आहे.

कार्यकर्त्याच्या जीवनात संघर्ष अटळ असतो.आपले शालेय,माध्यमिक शिक्षण खंबाळे,येथे झाल्यानंतर त्यांनी सिन्नर येथे रात्रीच्या शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले दिवसभर श्रमाचे काम करायचे आणि रात्री ज्ञानार्जन करायचे. कोणाच्या आयुष्यात कोणी तरी महान व्यक्ती येतो आणि आयुष्य उजळून जाते.

तो मग कार्यकर्ता होतो.'अशावेळी दिनकर सरांच्या आयुष्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार,ग्रंथ रुंजी घालु लागले.आणि तेथुनच ते शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा धागा बनत कार्यकर्ता झाले ,'पुढे महाविद्यालयीन जीवन जगत असताना ते समाजातील शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न घेऊन.कृतीच्या रिंगणात बेधडक उतरले.

जात्यांध मानसिकतेतुन खैरलांजी प्रकरण घडले तेव्हा महाराष्ट्रात अनेक संघटनांनी मोर्चे आंदोलने केली सर्व कार्यकर्ते पेटुन उठले होते यावेळी दिनकर गायकवाड सारखा मागे कसा राहील मग मात्र दिनकर सर सिन्नर आणि नाशकातील आंदोलनाच्या अग्रस्थानी आले.

तेथुन कार्यकर्ता भुमिका असलेल्या दिनकर सरांना अनेक थोरांचा सहवास मिळाला.रिपाईचे जेष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर दलित मुस्लिम ओबीसी महासंघाचे नेते संजय बाबा शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकर सरांनी आपली भूमिका निर्भिड मांडली यावेळी अनेक समविचारी कार्यकर्त सरांनी जोडले‌‌.

चळवळीत काम करताना कार्यकर्त्यांना कुठलेही मानधन नसते चळवळ म्हणजे सर्मपित आणि सेवाभावी भावनेने मानसिक समाधान मानत करावी लागते.अशावेळी मार्केटिंग सारख्या क्षेत्रात त्यांनी आपला जम बसविला अनेक कंपन्यांची मर्केटिंग करता करता ते आज ग्रीन पॉवर या कंपनीचे मालक बनले आहे ती गोष्ट वाखण्याजोगी  आहे.

चळवळीतल्या विचार प्रेरणेने मला कार्यकर्ता बनवले.समाज समजावून घ्यायचा असेल,तर समाजाची भाषा तुम्हाला नीट आली पाहिजे. असा सरांचा विचार इतरांना अंर्तमुख करून जातो.

सिन्नर-संगमनेर सीमेवर खंबाळे गाव असल्याने सरांचा मार्केटिंग काळात नाशिकचे सुखदेव कांबळे संगमनेरचे बंटी यादव,विजय आढाव, किशोर वाघमारे विनोद गायकवाड या चळवळीतल्या मित्रांची वैचारिक मैत्री झाली मग पुढे जेष्ठ रिपाइं नेते सुधाकर रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली ते आणखीच सक्रिय झाले याच दरम्यान त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले पत्रकारितेत देखील त्यांनी अनेक वृत्तपत्रात सडेतोड लिखाण केले.

दैनिक लोकनायकचे, विशेष प्रतिनिधी,तसेच संगमनेरच्या दैनिक भूगोलचे ते उपसंपादक राहिले आहेत आता ते नाशिक आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहे.ते उच्च शिक्षित असुन त्यांनी आपली पत्नी ॲड.सौ‌‌.दिपाजंली यांचे वकिली शिक्षण पूर्ण केले असून दिनेश सर आजही निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून जिंदगी जगत आहे. चळवळीतील कार्यकर्ता ही वेगळी गोष्ट आहे.त्याची सांगत राजकीय कार्यकर्त्याला लावू नये,असे असे त्यांना नेहमी वाटते.

महाराष्ट्रातील आणि नाशकातील अनेक सामाजिक कार्यात हिरहिरीने नेहमी सहभागी असलेले आणि त्यातुनच लोकसंग्राहक बनलेले दिनेश यांनी आपल्या कर्मभुमीलाच आपल्या जीवनाचे भागध्येय समजलं आहे ते समाज कार्यात नेहमी सहभागी असतात.

अनेकांच्या सुख दुःख ‌समयी नेहमी धावून येत असतात अतिशय संवेदनशील असलेल्या दोस्तीच्या पर्वातील नवा अध्याय रचणारा तळमळीचा कार्यकर्ता,ज्याच्या जीवनात पैश्याला नेहमी दुय्यम स्थान आहे.

पैसा मिळविला की माणूस सुखी होतो अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते त्यासाठी जो तो त्वरित पैसा कसा कमवावा याचाच विचार करताना दिसतो मग संपत्तीच्या मागे पळणारा माणूस माणुस्कीला विसरतो पण पैसा हे फक्त साधन आहे हे तो विसरतो,विकत घेतलेल्या ‌सर्वच वस्तू मानसिक सुख देतील असे नाही पैश्यापेक्षा मानवता महत्वाची असे अशी माणूसपणाची भिंत जपणारे दिनकर गायकवाड सर म्हणजे जवळपास निस्वार्थी नायकच...
वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा..
वाढदिवस एका संयमी मनाचा..
वाढदिवस एका उज्वल भविष्याचा..
वाढदिवस समतामुलक अभियानाचा..
वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा...
वाढदिवस एका कुशल संघटकाचा..
वाढदिवस एका सुसंस्कृत विचाराचा..
वाढदिवस एका विशाल नम्रतेचा..
वाढदिवस आपल्या माणसाचा..
वाढदिवस आमच्या भाऊचा..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा भाऊ
Wish You Happy Birthday Dinesh Sir..
-महेश भा.भोसले -संगमनेर 

manavmudrasvs2021@gmail.com
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!