ओढा गाव आणि इंदिरानगरातील दोन अपघातात चार ठार

Cityline Media
0
दोन जखमींना रुग्णालयात केले दाखल.

नाशिक दिनकर गायकवाड ओढा गाव आणि इंदिरानगर परिसरात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
अपघाताचा पहिला प्रकार ओढा गाव येथे घडला. फिर्यादी नीलेश अशोक गरुड (रा. पेठकर प्लाझा, पेठ नाका, पंचवटी) यांचा सावत्र मुलगा रितेश बाळू सूर्यवंशी (वय २३) हा त्याचा मित्र प्रकाश चंद्रकांत जाधव याच्या ताब्यातील एमएच १८ सीजी ३७८८ या क्रमांकाच्या मोटारसायकलीने परमेश्वर (प्रमोद) शिवाजी शिंदे (रा. अश्वमेधनगर, पेठ रोड, पंचवटी, नाशिक) याच्या मोटारसायकलीने ट्रिपलसीट निफाड येथील कामे आटोपून नाशिककडे येत होते.

त्यावेळी ओढा गाव येथे पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०४ एफएफ ८९५४ या क्रमांकाच्या एर्टिगा गाडीवरील चालकाने मोटारसायकलीस पाठीमागून धडक दिली. त्यात फिर्यादीचा सावत्र मुलगा रितेश सूर्यवंशी हा ठार झाला, तर त्याचे मित्र प्रकाश जाधव व परमेश्वर शिंदे यांना गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात कार चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार अहिरे करीत आहेत.

अपघाताचा दुसरा प्रकार वडाळा रोड येथे घडला. फिर्यादी दीपक वैजनाथ तौर (रा. मेहबूबनगर, वडाळा गाव) हे त्यांच्या आत्या यशोदा आसाराम कांबळे (वय ५५, रा. चुंचाळे, अंबड) यांच्यासोबत एमएच १५ बीक्यू ३३२८ या क्रमांकाच्या स्कूटी मोपेडने वडाळा रोडने पुणे हायवेकडे जात होते.

फिर्यादी हे कलानगर, वडाळा रोड येथे आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०४ एफपी ४७१७ या क्रमांकाच्या हायवा डम्पर ट्रकवरील चालकाने मोपेडला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कट मारला. त्यामुळे मोपेडचा तोल जाऊन खाली पडल्याने मोपेडवर मागे बसलेल्या यशोदा कांबळे या खाली पडल्याने त्यांच्या डोक्यावरून हायवा ट्रकचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या.या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ट्रक चालक विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!