नाशिक मध्ये ईव्हीएम निकालाच्या विरोधात जलसामान्यांचा एल्गार

Cityline Media
0
राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत खरात यांचा पराभव जिव्हारी;फेर मतमोजणीची मागणी 

 नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २७ च्या निकालाने नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.या प्रभागातील ईव्हीएम निकालात आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत गंभीर स्वरूपाची अनियमितता झाल्याचा दावा करत,प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला.
प्रभाग २६ मधील मतमोजणी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम केल्याचा आणि प्रत्यक्ष मतमोजणीत फेरफार करून निकाल फिरवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत खरात यांनी केला आहे. "लोकशाहीचा गळा आवळला जात असून,जनतेने दिलेला कौल प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने चोरला गेला आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया खरात यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

या प्रकाराची सखोल चौकशीची मागणी
प्रशांत खरात यांनी करत जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात काही प्रमुख मागण्या केल्या आहेत प्रभाग २७ मधील संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे.

निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता यांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.ईव्हीएम मशीनच्या नोंदी आणि प्रत्यक्ष पडलेली मते यामध्ये तफावत असल्याने फेरमतमोजणी घ्यावी. पोलिसांचा कडक बंदोबस्त मोर्चाचा विराट स्वरूप पाहता जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात नाशिक पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.यावेळी आंदोलकांचा संताप अनावर झाला होता. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. "प्रशासनाची दादागिरी चालणार नाही" आणि "लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचा निषेध असो" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

आम्हाला दहा हजारांपेक्षा जास्त मतदान झालेले असून ईव्हीएम मशीन मध्येच गडबड झाली असून चुकीची आकडेवारी जाहीर करण्यात आली.आमचा अल्प मतांनी झालेला पराभव मतदारांना मान्य नाही.जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे. री काऊंटिंग ची मागणी केलेली असून ती झाली पाहिजे अशी माझ्यासाह मतदारांची मागणी आहे.

यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र,आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आपला निषेध नोंदवत प्रशासनाला इशारा दिला की, जर या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. या निकालाच्या वादामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात आता ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!