नाशिक दिनकर गायकवाड राज्यासह नाशकात नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत नाशिकरोड येथील प्रभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता निकम
सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम,नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ व त्यांच्या सहका-यांच्या प्रभावी नियोजनामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पडली.त्यांच्या या कामगिरीबद्दल नाशिकरोड नागरिकांकडून कौतुक आणि ऋण व्यक्त केले जात आहे.
नाशिकरोड विभागात मागील अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप,वादविवाद, तणावपूर्ण वातावरण व काही ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणे हे नित्याचे झाले होते. प्रचाराच्या रणधुमाळीत सुरू होणाऱ्या आरोपांची परिणीती अनेकदा गुन्हे दाखल होण्यात होत असल्याने पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येत असे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती निर्माण होईल,अशी भीती सर्वसामान्य मतदारांमध्ये होती.
नाशिकरोड प्रभाग क्रमांक १६ ते २२ असे एकूण सात प्रभाग निवडणूक प्रक्रियेत होते. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभाग क्रमांक १६, १७, २० व प्रभाग २२ चा काही भाग, तर नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभाग १८, १९ व प्रभाग २२ चा काही भाग समाविष्ट होता. तसेच मतमोजणी प्रक्रिया नाशिकरोड येथील मनपा विभागीय कार्यालयात व सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये पार पडत असल्याने दोन्ही पोलीस ठाण्यांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताची जबाबदारी होती. कर्तव्यदक्ष व कडक शिस्तीचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे
अधिकारी म्हणून ओळख असलेले अधिकारी' पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर विशेष लक्ष दिले. निवडणुकीपूर्वीच शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करीत कायद्याचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे अनेक गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली आणि त्याचा सकारात्मक परिणाम निवडणूक काळात स्पष्टपणे दिसून आला. विशेष बाब म्हणजे या काळात नागरिक व पोलीस यांच्यात उत्तम समन्वय निर्माण झाला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताच नागरिक थेट
जीवलग मैत्रीचा नाशिकरोडवासीयांना लाभ एरवी 'हद्दीचा विषय' म्हणून टाळाटाळ केली जाते; मात्र नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी या प्रथेपेक्षा वेगळी भूमिका घेतली. हे दोघे एकाच बॅचचे अधिकारी असून कौटुंबिक, घनिष्ठ मित्र आहेत. त्यामुळे कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली, तरी हद्दीचा वाद न घालता एकमेकांच्या मदतीला तत्काळ धावून जाण्याची त्यांची भूमिका नाशिकरोड वासियांना दिलासा देणारी ठरली. कर्तव्य बजावताना मैत्रीही जपली जाते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व जयंत शिरसाठ यांच्याशी संपर्क साधत होते. जागरूक नागरिकांची ही भूमिका व पोलिसांची तत्काळ दखल, यामुळे संभाव्य तणाव टाळण्यात यश आले. देवळाली गावातील प्रभाग २२ मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या विषयावरील वाद व मतमोजणीनंतर झालेली हाणामारी वगळता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. मोठे अनुचित प्रकार, दंगलसदृश परिस्थिती वा गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या नाहीत, हेच पोलीस प्रशासनाच्या यशाचे द्योतक ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ
पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, जयंत शिरसाठ यांच्यासह उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, तसेच त्यांच्या मदतीला आलेल्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. नाशिकरोडवासीयांनी पोलिसांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत, अशीच तत्परता व संवेदनशीलता कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ
