भारतीय लहुजी सेनाची मागणी
श्रीरामपूर दिपक कदम शहरातील बेलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्थानकावर वंदे भारत व पॅसेंजर एक्सप्रेस थांबा द्या अशा मागणीचे निवेदन नुकतेच भारतीय लहुजी सेनेच्या वतीने रेल्वे व्यवस्थापक यांना देण्यात आले.
भारतीय लहुजी सेनाच्या वतीने निवेदन देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्रीरामपूर हे शहर अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व लोकसंख्याने मोठे तालुक्याचे ठिकाण असून येथे मोठ्या प्रमाणात कामगार व्यापारी विद्यार्थी शासकीय कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत.
श्रीरामपूर शहरांमध्ये जागृत श्रीरामाचे मंदिर असून शहराच्या आजूबाजूस जवळपास मोठी देवस्थाने आहेत जसे शनिशिंगणापूर, श्री दत्तगुरुचे तिर्थस्थान देवगड नवनाथाचे देवस्थान कानिफनाथ मंदिर मढी शिर्डी साईबाबा मंदिर शिर्डी मोहटा देवी देवस्थान पाथर्डी चिदंबर स्वामी मंदिर तसेच प्रभू श्रीरामाचे मंदिर बाभूळगाव गंगा संत ज्ञानेश्वर मंदिर नेवासा इत्यादी मोठ मोठी देवस्थाने श्रीरामपूर शहराच्या जवळपास आहेत.
श्रीरामपूर रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाची जंक्शन असून दररोज हजारो प्रवासी या स्थानावरून प्रवास करतात
सध्या सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस ही जलद आधुनिक व प्रवासी सुलभ सेवा असून ती अनेक मोठ्या व मध्यम स्थानावर थांबत आहे मात्र इतकी मोठी लोकसंख्या औद्योगिक व व्यापारी महत्व असलेले श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर सदर ट्रेनच्या थांबा नसल्यामुळे येतील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला समोर जावे लागत आहे.
वंदे भारत ट्रेन चा थांबा नसल्याने प्रवाशांना अहमदनगर नाशिक किंवा इतर दूरच्या स्थानकावर जावे लागत असून वेळ पैसा व श्रम यांच्या अपव्यय होत आहे श्रीरामपूर शहर व तालुक्याती प्रवाशांची संख्या भविष्यातील विकास औद्योगिक व शैक्षणिक गरज तसेच प्रवेशांच्या सोयींच्या विचार करत वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा देणे अत्यंत आवश्यक व न्याय्य आहे.
प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर सोय होईल तसेच रेल्वे प्रशासना सही संख्या मध्ये वाढ होऊन महसूल मिळेल तरी वंदे भारत एक्सप्रेसला श्रीरामपूर बेलापूर रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करावा यासाठी भारतीय लहुजी सेना च्या वतीने बेलापूर रेल्वे व्यवस्थापक श्री गोरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हनीफ पठाण जिल्हाप्रमुख रज्जाक भाई शेख, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख रईस शेख, रमजान शेख, मेहमुद पठाण, संदीप शेंडगे , बाळासाहेब त्रिभुवन, रमेज पोपटिया, नितीन श्रीसागर, गिरीश खैरनार, पोखाड, आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते हि मागणी पूर्ण न झाल्यास भारतीय लहुजी सेना चे सर्व पदाधिकारी घेऊन मोठा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला
