गाय छापच्या बाहाण्याने बालिकेचा विनयभंग करणारा जेरबंद

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड "२० रुपये देतो," असे सांगून पाच वर्षीय बालिकेला घरामध्ये घेऊन जात तिचा विनयभंग करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नुकतेच दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी नितीन दामोदर पालवे (वय ५४, रा. सिडको) याने फिर्यादीच्या पाच वर्षीय पीडित मुलीला २० रुपये देऊन तिला किराणा दुकानातील गाय छाप आणायला सांगितले.

त्यानुसार पीडितेने त्याच्यासाठी गायछाप आणून दिली.त्यानंतर आरोपीने पीडितेला २० रुपये देतो, असे सांगून त्याच्या राहत्या घरात घेऊन गेला. पीडितेला काही कळायच्या आत आरोपीने तिला मिठी मारून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागूल करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!