नाशिक दिनकर गायकवाड हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपून घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची साखळी मोटार सायकलीवरून आलेल्या अनोळखी इसमाने खेचून नेल्याची घटना पंचवटीत घडली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
फिर्यादी लता दिनकर सोनवणे (रा.बलरामनगर)
ही महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम आटोपून घराकडे पायी जात होती.त्यावेळी मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने सोनवणे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची ९० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन बळजबरीने खेचून चोरून नेली. या प्रकरणी आडगाव पोलीस आहेत.
